व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीनूसार नेहमी अॅपमध्ये बदल करत असते. आता व्हॉट्सअॅपने पुन्हा एक बदल केले आहे. त्यात ग्राहक इंटरनेट नसतानाही मॅसेजची देवाण-घेवाण करू शकता. 2021 पासून कंपनी या प्रणालीवर काम करत होती. अखेर कंपनीने ही सुविधा ग्राहकांना देण्याचे ठरवले आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या अपडेटमुळे ग्राहक मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानाही व्हॉट्सअॅप वेबचा वापर करून सेवेचा आनंद घेऊ शकता.
अनेकदा असे होते की, आपण व्हॉट्सअॅप डेस्कटॉपवरून चालवत असतो, त्यावेळी अनेका मोबाईलचे नेटवर्क जाते किंवा मोबाईलची चार्जिंग संपते, त्यामुळे डेस्कटॉपवर मॅसेजची देवाण-घेवाण करण्यात अडथळा निर्माण होते. अशीच एक तक्रार गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपकडे आली होती. त्यावर कंपनी गेल्या वर्षभरापासून काम करत होती. अखेर कंपनीने त्यावर अपडेट जारी केले असून, याद्वारे ग्राहक आता व्हॉट्सअॅप वेबचा वापर विनाअडथळा वापरू शकता. कंपनीने आठ महिन्यानंतर व्हॉट्सअॅप बिटा ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता ग्राहकाने एकदा की डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप लॉगिन केले की, मग ने मोबाईलची चार्जिंग संपली किंवा नेटवर्क गेले तरी तरी हरकत नाही.
व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर्स केवळ व्हॉट्सअॅप वेबसाठी आहे. जर तुम्ही डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप चालत असाल तर हा फिचर्स तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोरमधून व्हॉट्सअॅपला अपडेट करून घ्यावे लागणार आहे. अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन लिंक डिव्हाईस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला Multi-Device Beta असा पर्याय समोर आला असेल. त्यावर क्लिक करुन बीटा व्हर्जन जॉईन करा. त्यावर आता तुमच्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप सुरू झाले असेल. आता तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसले तरी, तुम्ही डेस्कटॉप व्हॉट्सअॅपचा आनंद घेऊ शकता.
मल्टी डिव्हाइस सपोर्ट
व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉप बीटा व्हर्जनमध्ये ग्राहकांना आणखी एक मल्टी डिव्हाइस सेवा देखील देण्यात आली आहे. त्याद्वारे ग्राहक चार ठिकाणी डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा आनंद घेऊ शकणार आहे.