Home Stock Market एनएसई च्या माजी सीईओला केली अटक:​​​​​​​चित्रा रामकृष्ण यांना तीन दिवसांच्या चौकशीनंतर अटक

एनएसई च्या माजी सीईओला केली अटक:​​​​​​​चित्रा रामकृष्ण यांना तीन दिवसांच्या चौकशीनंतर अटक

को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी CBI ने रविवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक केली आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामकृष्ण यांना दिल्लीत अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना सीबीआय मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे.

अधिका-यांनी सांगितले की, CBI ने सलग तीन दिवस रामकृष्ण यांची चौकशी केली आणि त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्या तपासात सहकार्य करत नसल्याचे आणि योग्य प्रतिसाद देत नसल्याचे त्यांनी सांगितले. CBI शिवाय केंद्रीय फोरेंसिक विज्ञान प्रयोगशाळेच्या वरिष्ठ मानसशास्त्रज्ञानेही त्यांची चौकशी केली.

त्यांना अटक करण्याशिवाय एजन्सीकडे पर्याय उरला नसल्याचा निष्कर्षही मानसशास्त्रज्ञांनी काढला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

दिल्लीस्थित स्टॉक ब्रोकरच्या विरोधात 2018 पासून या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. सेबीच्या अहवालानंतर NSE च्या तत्कालीन उच्च अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे प्रकरण समोर आले होते. 25 फेब्रुवारी रोजी, सीबीआयने सेबीच्या अहवालातील “ताज्या तथ्या” नंतर एक्सचेंजमधील घोटाळ्याच्या चौकशीचा विस्तार केल्यानंतर NSE समूहाचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना अटक केली होती.