मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. पुण्यात सहा ठिकाणी सीबाआयनेही छापेमारी केली. छापेमारी झालेल्यात पर्यावरण मंत्री व युवासेनेचे पदाधिकारी राहूल कनाल शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांचाही समावेश आहे.
शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला.
आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीला सुरूवात केली. शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापुर्वी ही कारवाई झाल्याने एकप्रकारे हे शिवसेनेसाठी आव्हानच ठरले आहे.
पुण्यातील उद्योजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात 40 ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, जालना, यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत.
आयकर विभागाने मुंबई, पुणे, नागपूरसह जवळपास 50 ठिकाणी हे छापे टाकले. 25 निवासस्थाने आणि 15 कार्यालयांची तपासणी केली. मुंबईतील एका हॉटेल्सच्या काही सुट्सवरही छापे टाकण्यात आले.
महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक, बेंगळुरू येथेही आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले. यामध्ये सुमारे 50 घरांवर छापे टाकण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापैकी काही छाप्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार म्हणाले, की त्यांच्या तीन बहिणींशी संबंधित कंपन्यांवर काही छापे टाकण्यात आले आहेत.