केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी दिली. त्यांना बुधवारपासून बायोलॉजिकल-ईची लस “कोर्बाेव्हॅक्स’ दिली जाईल. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांनाही बुधवारपासून बूस्टर डोस दिला जाईल. आतापर्यंत ६० वर्षांवरील गंभीर आजारी ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जात होता.
बूस्टर डोस “कोव्हॅक्सिन’चा आहे. ही लस १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीनांना टोचली जात आहे. १२-१४ वयातील मुलांच्या लसीकरणासाठी बायोलॉजिकल-ईशी ३० कोटी डोसचा करार केला आहे. केंद्राला ५ कोटी डोस मिळाले आहेत. या वयोगटाची लोकसंख्या ७ कोटी आहे.