गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेलवरच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हे पर्यायी इंधन म्हणून, या फ्लेक्स इंधनावर भर दिला जात आहे. या फ्लेक्स इंधनाचा सर्वाधिक भर इलेक्ट्रिक वाहनांवर दिला जात आहे. यामध्ये पर्यायी इंधन म्हणून फ्लेक्स-इंधनचा विचार होत आहे. या फ्लेक्स इंधनच्या वाहनांनवर एक नवीन योजना आखण्याचे काम सुरू आहे, जगभरात प्रसिद्ध असलेल्या नामवंत वाहक उत्पादक कंपन्यांनी येत्या सहा महिन्यांत फ्लेक्स-इंधनावर चालणारी वाहने तयार करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 12 मार्चला ‘ईटी ग्लोबल बिझनेस समिट’ कार्यक्रमात सांगितले.
फ्लेक्स-इंधन हा पेट्रोल-डिझेलचा एक प्रकार आहे. म्हणूनच या फ्लेक्सला पर्यायी इंधन असे संबोधले आहे. फ्लेक्स हा इंग्रजी शब्द फ्लेक्झिबलपासून आला आहे.
आपल्या देशात 80 टक्के पेट्रोल आणि डिझेल आयात केले जाते. इथेनॉल, मिथेनॉल हे जैव-उत्पादन असून, ते ऊस, मका आणि इतर कृषी कचऱ्यापासून तयार केले जाते. त्यामुळे या इंधनाची किंमत देखील कमी असते. आपल्या देशात ऊस आणि मक्याचे उत्पादन हे जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे या इंधनाचे उत्पादन वाढू शकते. म्हणून या फ्लेक्स इंधनामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती देखील सुधारू शकते.
बाजारात येणाऱ्या फ्लेक्स इंधनामुळे सर्व वाहने डिझेल किंवा इथेनॉलवर धावू शकतील. दरम्यान, या इंधनामुळे होणारे प्रदुषण देखील कमी आहे. तसेच आपल्या देशात प्रदुषण ही खुप मोठी समस्या आहे. म्हणून हे प्रदुषण कमी करण्यासाठी फ्लेक्स इंधनाची संकल्पना मांडण्यात आली आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी फ्लेक्स इंधनाबाबतचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत.