नागपूर ब्यूरो : राज्य सभा खासदार श्री प्रफुल पटेल यांनी आज (२३ मार्च) रोजी नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. श्री पटेल यांनी एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज आणि सीताबर्डी इंटरचेंजते झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो राईड केली. नागपूर मेट्रो प्रकल्पाची अतिशय सुयोग्यपणे अंमलबजावणी झाल्या बद्दल त्यांनी प्रशंसा केली.
श्री पटेल यांनी एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रो राईड केली. सीताबर्डी इंटरचेंजते येथे स्टेशन परिसरातील विविध सोइ आणि सुविधांची माहिती त्यांनी घेतली. तत्पश्चात सीताबर्डी इंटरचेंजते झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन दरम्यान त्यांनी राईड केली.येथे देखील फ्रिडम पार्क आणि इतर वैशिष्ठ्ये त्यांनी जाणून घेतली.
या भेटीदरम्यान डॉ. दीक्षित यांनी श्री. पटेल यांना दोन्ही स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या विविध सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी श्री पटेल यांना फ्रीडम पार्क स्टेशनबद्दल माहिती दिली – ज्याला स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी हे नाव देण्यात आले होते. नंतर श्री. पटेल यांनी मेट्रो भवनला भेट दिली आणि इमारतीची विविध वैशिष्ट्येही पाहिली.मेट्रो राईड दरम्यान श्री पटेल यांनी महा मेट्रो तर्फे निर्माण झालेले इतर प्रकल्प देखील बघितले. यात वर्धा रोड वरील डबल डेकरचा समावेश आहे. महा मेयट्रोने जागतिक दर्जाच्या दळणवळण संबंधित प्रकल्पाची निर्मिती केल्याचे ते म्हणाले. याचा येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे देखील ते म्हणाले. या प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान अनेक छोट्या तपशिलांची विशेष दखल घेतल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन आणि कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन दरम्यान असलेल्या दोन मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरु झाली की नागपूर मेट्रो प्रकल्पाची व्याप्ती नक्कीच वाढेल आणि याचा सर्व सामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल, असे श्री पटेल म्हणाले. नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेल्या विविध बाबींची माहिती देखील त्यांनी या दरम्यान घेतली.
नागपूर मेट्रो प्रकल्प हा भविष्याचा वेध घेणारा तसेच तितक्याच सुयोग्यपणे डिझाईन केलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी देखील तितकीच उत्कृष्ट असल्याचे श्री पटेल म्हणाले. नागपूर मेट्रो प्रकल्पाचे अतिशय योग्यपणे नियोजन केल्याचे सांगत श्री पटेल यांनी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित आणि मेट्रोच्या पूर्ण टीमचे या निमित्ताने अभिनंदन केले.
मेट्रो भवन येथे झालेल्या बैठकीत श्री पटेल यांना नागपूर मेट्रो प्रकल्पाबद्दल अधिक माहिती दिली गेली. महा मेट्रो तर्फे संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) श्री सुनील माथूर आणि संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री अनिल कोकाटे उपस्थित होते. श्री दीक्षित यांनी श्री पटेल यांना स्मृतीचिन्ह भेट दिले.