देशात २४ मार्च २०२० रोजी पहिल्यांदा कोरोनामुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन लागला होता. आता दोन वर्षांनंतर केंद्राने ३१ मार्च २०२२ पासून कोविडचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम लागू असतील. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत निर्देश दिले आहेत. भल्लांनी स्पष्ट केले की, ३१ मार्चनंतर गृह मंत्रालयाकडून यासंदर्भात इतर कोणताही आदेश दिला जाणार नाही.
- कारण-1 : मे 2020 मध्ये 4.1 लाख रुग्णांचा पीक होता, आता 1916 नवे रुग्ण
- कारण-2… 18+ च्या 83% लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेलेत
- 12 मार्च 20 ला पहिला मृत्यू झाला. 17 मे 21 ला कमाल 4334 मृत्यू. 22 मार्चला 62 मृत्यू झाले.
- 15-18 वर्षांच्या 49% लोकांना दोन्ही डोस व 12-14 वर्षांच्या 7% मुलांना एक डोस मिळाला.