Home Cricket आयपीएल आजपासून; 10 संघ, 65 दिवस, 74 सामने, आज चेन्नई-कोलकात्यात पहिला सामना...

आयपीएल आजपासून; 10 संघ, 65 दिवस, 74 सामने, आज चेन्नई-कोलकात्यात पहिला सामना सायं. 7.30पासून

आयपीएलच्या १५ व्या हंगामाला आजपासून प्रारंभ होत आहे. २६ मार्चपासून २९ मेपर्यंत चालणारा हा हंगाम अनेक अर्थांनी वेगळा आहे. ११ वर्षांनंतर १० संघ भिडतील. हा आजवरचा सर्वात दीर्घ हंगाम असेल, जो ६५ दिवस चालेल. सर्वाधिक ७४ सामने होतील. पहिल्यांदा सर्वाधिक १२ दिवस दोन-दोन सामने होतील. ६ संघांचे नवे कर्णधार असतील. १४ वर्षांत प्रथमच विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी कर्णधार नसतील. १५ व्या हंगामाचा प्रारंभ २६ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये गत चॅम्पियन चेन्नई व कोलकाता यांच्यातील सामन्याने होईल.

महिला आयपीएल ६ संघांसह पुढील वर्षी घेतली जाणार
महिला क्रिकेटर्सचे आयपीएलही पुढील वर्षापासून ६ संघांसह सुरू होऊ शकते. शुक्रवारी आयपीएल गव्हर्निंग काैन्सिलच्या बैठकीत बीसीसीआय अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मांडला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, ‘हा प्रस्ताव एजीएमकडून अनुमोदित केला जाणार आहे.