Home Bollywood 27 मार्चपर्यंत पूर्ण होणार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाचे स्पेन...

27 मार्चपर्यंत पूर्ण होणार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाचे स्पेन शेड्यूल

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्पेनमध्ये त्यांच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. हे दोघे सध्या स्पेनच्या मल्लोर्का बेटावर एका गाण्यासाठी शूटिंग करत आहे. त्यानंतर तो स्पेनमधील कॅडीझ आणि जेरेझ येथे जातील, तिथे हे दोघे 27 मार्च रोजी शेड्यूल पूर्ण करतील.

ट्रेड सोर्सनुसार, “पठाण हा स्पेनमधील मॅल्लोर्का येथे चित्रित झालेला पहिला चित्रपट आहे. त्याची एक्सपेंसिव्ह आणि आलिशान सेटिंग याला जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक बनवते. सिद्धार्थ आनंद आणि यशराज फिल्म्सला पठाण या चित्रपटाचे चित्रीकरण येथे करायचे होते. हिंदी चित्रपटांमध्ये आजवर जे दिसले नाही, ते दाखवण्याचा सिद्धार्थ आनंद आणि यशराज फिल्म्स्चा उद्देश आहे.”

‘पठाण’ शेड्यूलबद्दल पुढे बोलताना सूत्राने सांगितले की, “मॅल्लोर्कानंतर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अ‍ॅक्शन शेड्यूलसाठी कॅडीझ आणि जेरेझला जातील. जिथे ते काही जीवघेणे स्टंट चित्रीत करतील.”

सूत्राने सांगितल्यानुसार, “पठाणची टीम 27 मार्चपर्यंत स्पेनचे वेळापत्रक पूर्ण करेल. सिद्धार्थ आनंदला प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एक मोठे इंटरनॅशनल शेड्युल हवे होते आणि आपले हे स्वप्न YRFच्या मदतीने पूर्ण करण्यात तो यशस्वी झाला. शाहरुख आणि दीपिकाच्या जोडीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि पठाण हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट बनवण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.”