Home मराठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांविरोधात 500 कोटींचा मानहानी...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांविरोधात 500 कोटींचा मानहानी दावा

राज्यात भाजपची सत्ता असताना सहा राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही नाव आहे. याप्रकरणी फोन टॅप करणाऱ्या पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नाना पटोले यांनी नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात ५०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला. सोशल मीडियातून नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. पुणे येथील २०१७-१८ मध्ये फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्या वेळी रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलिस आयुक्त होत्या.

राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. समितीने याचा अहवाल पुणे येथील गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्याकडे सोपवण्यात आला. चांदगुडे यांनी शुक्ला आणि इतरांविरोधात २५ फेब्रुवारी २०२२ रोजी बंड गार्डन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावेळी सहा राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. या राजकीय नेत्यांचे फोन क्रमांक विविध नावांनी सेव्ह केले होते. अमजद खान या नावाने नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला. या गोष्टी बेकायदेशीर मार्गाने केल्या.