Home हिंदी Nagpur । एअरोमॉडेलिंगचा थरार, 10 हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हॉर्स रायडिंग व सांस्कृतिक...

Nagpur । एअरोमॉडेलिंगचा थरार, 10 हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हॉर्स रायडिंग व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

मानकापूर विभागीय क्रीडा संकुल परिसरात रविवारी भव्य दिव्य एअरोमाॅडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १० हजार शाळकरी विद्यार्थ्यांना हा रोमांचकारी थरार अनुभवला.

एनसीसी कॅडेट्सचा सत्कार :

प्रजासत्ताकदिनी परेडमध्ये नागपुरातील एनसीसीच्या ७ कॅडेट्सनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचा गौरव करण्यात आला. त्यात २० महाराष्ट्र बटालियनचे एसयूओ मनीष वावरे, हर्ष पुरी, मयंक चिचूलकर, ४ महाराष्ट्र बटालियनचे ओम झाडे, २ महाराष्ट्र बटालियनच्या जेयूओ श्रुती ओझा, २ महाराष्ट्र आर्मस्कॉडनच्या एसयूओ प्रिया मिश्रा, ४ महाराष्ट्र बटालियनच्या एसयूओ तृशाली कुथे यांचा ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना हवाई क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती व्हावी, आकाशामध्ये विमानाप्रमाणे उंच भरारी घेता यावी, देशाच्या लष्करी सेवा व राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये भरती होण्यासाठी ‘एअरोमॉडेल शो’चे आयोजन क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. एनसीसीच्या टू सीटर ‘मायक्रोलाइट वायर’ विमानाचे स्टेडियमवरून अगदी जवळून पथ संचलनाने विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली.

क्याटापुल्ट ग्लायडरसह इतर एअरोमॉडेल्सचा सहभाग
२५ विविध एअरोमॉडेल्सचे एनसीसीकडून अवकाशात प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये चूक ग्लायडर, क्याटापुल्ट ग्लायडर, सीएल एअरोबॅक्टिक्स, आरसी ग्लायडर, स्काय सर्फर, सुखोई, डेल्टा विंग, फ्लाइंग सॉसर, फ्लाइंग कॅडेट, पॅरामोटर, इलेक्ट्रिक जेट मॉडेल- एफ १८, मायक्रोलाइट, मल्टिकॉप्टर, स्नुपी, काओस आदी एअरोमॉडेल्सचा सहभाग होता.