पुणे ब्यूरो: महाहॅण्डलूम आणि हातमागावर उदरनिर्वाह करणाºया विणकरांनी नवीन उमेदीने आपल्या कलेला जगाच्या कानाकोपºयापर्यंत पोहचविण्याचे काम सूरु केले आहे. कोरोनाच्या भयंकर संकटातून निर्माण झालेल्या सर्व समस्यांशी दोन हात करुन, त्याच हातांनी समृद्धीचे वस्त्र विणण्यांचे आणि वस्त्र संस्कृतीचा अमूल्य ठेवा जोसपाण्याचे काम आपले विणकर अविरतपणे करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे व डिजीटल मंचावर जागतिक स्थान व ओळख मिळावी याकरिता सांस्कृतिक नगरी आणि माहिती व तंत्रज्ञानाचे शहर अशी ख्याती असलेल्या पुणे शहरात वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासना तर्फे राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
टिळक स्मारक, सदाशाविपेठ, पुणे येथे आयोजित प्रदर्शन 28 मार्च पासून 10 अप्रिल पर्यंत सकाळी 11 से रात्री 9 यावेळेत सर्व पुणेकरांच्या सेवेत सूरु राहणार आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कूमार यांचे हस्ते 28 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले. याप्रसंगी वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले ह्या उपस्थित होत्या.
प्रदर्शनीत हातमागावर उत्पादीत अस्सल वस्त्रे जसे सिल्क/टस्सर करवती साडी व पैठणी साडी (जीआय प्रमाणित), सिल्क, टस्सर ड्रेस मटेरिअल, लेडीज/जेन्ट्स व किड्स गारमेंट्स, बांबू बनाना फॅब्रिक्स व साड्या, कॉटन साडी, स्कार्फ, स्टोल, दूपट्टे, टाय, दैनंदीन वापरायच्या चादरी, टॉवेल, बेडशिट, दरी, वॉलहॅँगिंग आणि बरेच काही विक्रीस उपलब्ध आहे.
हातमागावर उत्पादीत कापड फार वैभावशाली असते. या प्रदर्शनीच्या माध्यमातून खरेदीदारांना व उत्पादक विणकरांना एकाच मंचावर येऊन विचारांची व आवडीनिवडीची देवाणघेवाण करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनी मध्ये प्रवेश नि:शुल्क असून सर्व सहभागी हातमाग संस्थातर्फे 20% विशेष सूट देय राहील. या प्रदर्शनीस पुणेकरांनी अवश्य भेट देऊन, हातमागावरील वस्त्र प्रावरणांची खरेदी करुन हातमाग उद्योगाला व विणकरांना प्रोत्साहीत करण्याचे आवाहन शीतल तेल-उगले यांनी केले आहे.