Home हिंदी मुख्यमंत्र्यांचा संवाद : शेतकरी कधीच वर्क फ्रॉम होम करू शकत नाही

मुख्यमंत्र्यांचा संवाद : शेतकरी कधीच वर्क फ्रॉम होम करू शकत नाही

773

मराठा आरक्षणासाठी आम्ही कटीबद्ध : मुख्यमंत्री ठाकरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवार ला सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की शेतकरी आपल्या सर्वांप्रमाणे वर्क फ्रॉम होम करू शकत नाही. त्याच्या बाबतीत विचार करने जास्त महत्वाचे आहे. ते म्हणाले शेतकऱ्यांना “हमी भाव नाही, हमखास भाव देऊ.”

त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आहे. मात्र मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आम्ही तसूभरही मागे हटणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी याप्रसंगी मांडली.

ते म्हणाले कि राज्याच्या 12 कोटी लोकांची चाचणी करने शक्य नाही. मात्र ‘माझे कुटुंब, माझी जवाबदारी’ योजने च्या अंतर्गत घरा घरात जाउन चौकशी करणार. आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे. ते म्हणाले की बाहेरून आल्या नंतर हात -पाय धुआ. जिथे शक्य आहे तिथे ऑनलाइन खरेदी करा.

हे सुद्धा म्हणाले मुख्यमंत्री…

  1. सर्वांनी कोरोना विरोधी मोहिमेत शामिल व्हायचे आहे.
  2. पुन्हा लॉक डाउन करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये.
  3. हे जगावरचे महाभयंकर संकट आहे.
  4. तोंडावर बोलू नका. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अंतर पाळा.
  5. शिवभोजन थाळी आता 5 रुपयात दिली जाट आहे.
  6. आपण गरज पाहुन आवश्यक आरोग्य विषयी सुविधा पुरवित आहोत.
  7. सरकार म्हणून प्रत्येक काम आपण करीत आहोत.
  8. केंद्रीय पथकाने सुद्धा पाहणी केली व समाधान व्यक्त केले आहे.
  9. पूर्व विदर्भातील लोकांना पूर्ण मदत केली जाईल.
  10. हमी भाव नाही, हमखास भाव देऊ
  11. शेतकऱ्यांसाठी आता “विकेल टेच आता पिकेल”
  12. मराठा आरक्षण साठी राज्याचे सर्व पक्ष एकमत होते
  13. शासनाने कोर्टात पाठपुरावा केला
  14. कोरोनाचे संकट वाढत आहे, मात्र मिळून आपण मार्ग काढू.