Home मराठी खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीकडून टाच, दादरमधील एका फ्लॅटसह अलिबाग येथील...

खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीकडून टाच, दादरमधील एका फ्लॅटसह अलिबाग येथील 8 प्लॉट्सचा समावेश

शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये दादरचा एक फ्लॅट आणि अलिबागमधील 8 प्लॉट्सचा समावेश आहे. ईडीकडून ही मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता.

माध्यमाशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही काय प्रॉपर्टीवाले आहोत का. 2009 साली आम्ही कष्टाच्या पैशाने जमीन घेतली. त्यावेळी कुणी काही चौकशी केली नाही. आता म्हणे, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 2009 मध्ये घेतलेली ती प्रॉपर्टी एक एकर सुद्धा नाही. आमच्या नातेवाईकांनी स्वतःच्या कमाईने घेतलेल्या त्या जागा आहेत.

फ्लॅटबद्दल बोलायचे झाल्यास, माझे एका मराठी माणसाचे राहते घर जप्त करण्यात आले आहे. आता भाजपवाले फटाके फोडत असतील. पण, यातूनच लढण्याची प्रेरणा मिळत असते. या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले आढळले तर मी स्वतः माझी संपत्ती भाजपला दान करेल असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या अटकेची मागणी केली आहे. ईडीने त्यांच्याविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई केली. अर्थातच त्यांनी भ्रष्टाचार झाला. आता त्यांना महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांप्रमाणे तुरुंगात टाकायला हवे अशी मागणी नितेश राणे यांनी केली.