Home Bollywood टॉलीवूडच्या राजामौलींची 7 वर्षांत 3 चित्रपटांची निर्मिती; कमावले 3460 कोटी

टॉलीवूडच्या राजामौलींची 7 वर्षांत 3 चित्रपटांची निर्मिती; कमावले 3460 कोटी

केवळ ७ वर्षांच्या आत बाहुबली आणि आरआरआरसारख्या ३-३ सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणारे एसएस राजामौली देशातील सर्वात यशस्वी दिग्दर्शक ठरले आहेत. त्यांच्या चित्रपटांनी जगभरात ३,४६० कोटी रुपये कमावले आहेत. बॉलीवूडचा क्रमांक-१चा दिग्दर्शक रोहित शेट्टीचेे १९ वर्षांतील १४ चित्रपट जगभरात २,६९४ कोटी रुपये कमावू शकले. रोहित शेट्टीचा सर्वात यशस्वी चित्रपट चेन्नई एक्स्प्रेसने ३९६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दुसरीकडे, राजामौलीचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट बाहुबली-२ने १८१० कोटी रु. कमावले होते. हा भारतीय चित्रपट इतिहासातील विक्रम आहे.

राजामौलींच्या ‘आरआरआर’ने १० दिवसांत बाहुबली-२ ची ५०% कमाई केली
आरआरआर 900
बाहुबली-2 1810
बाहुबली 650
(कमाई कोटी रुपयांत)

*राजामौलीने २०१५ पासून आतापर्यंत ३ चित्रपट केले.
*तीनही ब्लॉकबस्टर ठरले, म्हणजे १००% यशस्वी.
*१००० कोटींपेक्षा जास्त बजेटच्या चित्रपटांची निर्मिती
*आरआरआरने सर्वात मोठ्या बजेटच्या २.० ला मागे टाकले.

शेट्टीचे ४ चित्रपट ३०० कोटी क्लबमध्ये ५ ब्लॉकबस्टर, ६ हिट, १ फ्लॉप ठरला
चित्रपट कमाई
चेन्नई एक्स्प्रेस 396
सिम्बा 391
दिलवाले 372
गोलमाल अगेन 311
सूर्यवंशी 297
सिंघम रिटर्न्स 217
(कमाई कोटी रुपयांत)

*गोलमाल मालिकेतील २ चित्रपट ब्लॉकबस्टर,२ हिट. *सिंघम-सिंघम रिटर्न्स हिट, सिम्बा-सूर्यवंशी ब्लॉकबस्टर. *जमीन व ऑल द बेस्ट अॅव्हरेज, संडे फ्लॉप. *बोल बच्चन व दिलवाले १००-१५० कोटी कमावले.