युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धाला ५० दिवस पूर्ण झाले. या काळात रशियाचे ४५० पेक्षा जास्त रणगाडे, २ हजारांहून जास्त सशस्त्र वाहनांचे नुकसान झाले. रशियाने प्रमुख २७०० रणगाड्यांपैकी ७३९ रणगाडे गमावले आहेत. म्हणजे ३० टक्के तोफा. त्याशिवाय १९ हजार ८०० सैनिक, १५८ विमाने, १४३ हेलिकॉप्टरदेखील नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केला. रशियाने केलेल्या हवाई कारवाईत युक्रेनच्या ४.७ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. पूर्वेकडील भागावर ताबा मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.
उद्ध्वस्त युक्रेनला नव्याने उभारणीसाठी १६ लाख कोटी रुपये ते ३८ लाख कोटी रुपये यादरम्यान खर्च करावा लागेल, असा अंदाज अर्थ शास्त्रज्ञांच्या नेटवर्क सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्चने (सीईपीआर) व्यक्त केला आहे. ही गणना युक्रेन सरकारच्या आपल्या यंत्रणेच्या पाहणीवर आधारित आहे. यंदा युक्रेनच्या जीडीपी मध्ये ४५ टक्के एवढी घट येईल, असे जागतिक बँकेला वाटते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन म्हणाले, युक्रेनसोबतची शांती चर्चा निष्फळ ठरली आहे. आता रशियाला युक्रेनमध्येच यश मिळेपर्यंत लष्करी कारवाई सुरूच राहील.
29 टक्के युक्रेनचा भाग युद्धग्रस्त, ३० टक्के आस्थापनांची कामे बंद. 100 जागतिक वारसा स्थळांची युद्धकाळात हानी, युनेस्कोच्या यादीत. 2.2 लाख कोटी रुपयांच्या वसाहतींची हवाई हल्ल्यात हानी.