Home Social शांतीवन चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

शांतीवन चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नागपूर ब्यूरो: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती भारतीय बौद्ध परिषद शांतीवन चिंचोली च्या वतीने साजरी करण्यात आली. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करून प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. तसेच धम्मसेनापती वा. मो. गोडबोले व महादायिका गोपिकाबाई ठाकरे यांच्याही प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

विहारात पूज्य भन्ते कौंडिण्य यांनी बुद्ध वंदना घेतली. यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी उपासक चंद्रमणी लवात्रे यांच्या तर्फे बुंदीचे लाडू चे वाटप करण्यात आले.

या वेळी संस्थेचे वतीने संजय पाटील, चंद्रशेखर गोडबोले, प्रदीप लामसोंगे, प्रकाश सहारे, प्रल्हाद खोब्रागडे, शशी राऊत, अशोक गाडगे, हरीश वंजारी, प्रवीण पाटील, राहूल भैसारे, धम्मपाल दुपारे, माधवी सरोदे, उपस्थित होते.