विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट आली असून अकोला, चंद्रपूर, वर्धा या शहरांत मंगळवारी (दि.१९) हंगामातील आतापर्यंतच्या उच्चांकी ४४.८ तापमानाची नोंद करण्यात आली. १६ शहारांतील तापमानही ४० अंशांपार गेले होते. दरम्यान, राज्यात २० ते २५ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
विदर्भापासून ते कर्नाटकपर्यंत वाऱ्याचा प्रवाह खंडित झाला आहे. हवेच्या कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत गोलाकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
प्रमुख शहरांतील तापमान
*अकोला ४४.८ *वर्धा ४४.८ *चंद्रपूर ४४.८
*ब्रह्मपुरी ४४.७ *नागपूर ४३.६ *जळगाव ४३.५ *अमरावती ४३.४ *परभणी ४३.३ *गोंदिया ४३.२ *मालेगाव ४३.२ *वाशिम ४३.० *अहमदनगर ४२.९ *नांदेड ४२.० *बुलडाणा ४१.५ *सोलापूर ४१.४ *औरंगाबाद ४०.९ *नाशिक ३८.१