Home Exam राज्याची CET परिक्षा पुढे ढकलली; JEE, NEET च्या तारखांमुळे CET लांबणीवर

राज्याची CET परिक्षा पुढे ढकलली; JEE, NEET च्या तारखांमुळे CET लांबणीवर

राज्याची CET परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. JEE आणि NEET च्या तारखांमुळे CET परीक्षा लांबणीवर गेली आहे. 3 ते 10 जून यादरम्यान CET ची परीक्षा होणार होती. मात्र, सध्या ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, नवे वेळापत्रक देखील जाहीर केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सामंत यांनी आपल्या ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. जेईई मेन आणि नीट परीक्षांमुळे राज्यातील सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. सीईटी परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सामंत यांनी कळवले आहे.

JEE आणि NEET परीक्षा जून आणि जुलै महिन्यात होणार आहेत. जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र 29 जून तर दुसरे सत्र 30 जुलै 2022 रोजी संपणार आहे तर नीट परीक्षा 17 जुलै 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परिणामी राज्यातील MHT CET 2022 परीक्षा त्यानंतर ऑगस्ट महिन्यात घेतली जाणार आहे, जेणेकरून या परीक्षा एकमेकांशी क्लॅश होणार नाहीत.