Home मराठी Maharashtra । जिवाची लाही लाही… राज्यात 25 हून अधिक शहरांचा पारा 41...

Maharashtra । जिवाची लाही लाही… राज्यात 25 हून अधिक शहरांचा पारा 41 अंशांच्या पार

देशातील ७० टक्के भागांत उष्णतेची लाट सुरू असून यात ८० टक्के लोकसंख्येच्या जिवाची लाही लाही होत आहे. बुधवारी देशातील ३३ शहरांत तापमान ४४ अंशाच्या वर होते. यात ७ शहरांत तापमान ४५ अंशाहून अधिक होते. दरम्यान, महाराष्ट्रात २५ हून अधिक शहरांत पारा ४१ अंशाच्या वर सरकला. ब्रह्मपुरी आणि वर्धा शहरांत तापमान ४५ अंशावर होते.

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, विदर्भामध्ये सर्वात जास्त उन्हाची तीव्रता राहणार असल्याचे सांगितले. आगामी आठवडाभर राज्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढता राहणार आहे.

देशात रविवार ठरणार उष्णवार : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड या राज्यांत एप्रिलच्या अखेरच्या तीन दिवसांत तापमान वाढते राहील. १ मे रोजी उष्णतेच्या लाटेचा पीक असेल. या राज्यांत अनेक भागांत तापमान ४७-४८ अंशावर जाण्याची शक्यता आहे. २ मेपासून मात्र तापमानात घट होईल.

राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान ब्रह्मपुरी ४५.१ वर्धा ४५.० अकोला ४४.८ नागपूर ४४.८ चंद्रपूर ४४.६ यवतमाळ ४४.२ जळगाव ४४.२ गोंदिया ४३.८ परभणी ४३.७ अहमदनगर ४३.७ वाशीम ४३.५ मालेगाव ४३.२ सोलापूर ४३.० जेऊर ४३.० गडचिरोली ४२.६ नांदेड ४२.२ औरंगाबाद ४२.१ उस्मानाबाद ४१.९ बुलडाणा ४१.८ पुणे ४१.३ नाशिक ४१.० सातारा ४०.६ सांगली ४०.२ कोल्हापूर ३९.७