Home मराठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा, राज ठाकरे यांच्या सभे कडे...

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा, राज ठाकरे यांच्या सभे कडे लक्ष्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा धसका महाविकास आघाडीने चांगलाच घेतला आहे. राज्यातील आघाडी सरकारचे सर्वेसर्वा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी (२९ एप्रिल) चर्चा झाली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सायंकाळी ६ वाजता दोघांची भेट झाली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी १ मे रोजी औरंगाबदेत जाहीर सभा आहे. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असा इशारा मनसेने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर पवार-ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर आहेत. मात्र, प्रचाराच्या वातावरण निर्मितीला प्रारंभ झाला आहे. विरोधक भडकावू वक्तव्य करत आहेत. मोठ्या सभांचा तारखा निश्चित झाल्या आहेत. विरोधकांच्या कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या कृतीला उत्तर कसे द्यायचे यावर चर्चा झाल्याचे समजते. बैठकीला उद्धव ठाकरे व खासदार शरद पवार हे दोघेचे होते. त्यामुळे या चर्चेतील तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.