Home मराठी जेएनपीटीमधून जगातील तब्बल 200 देशांसोबत व्यवहार, देशातील 50 टक्के आयात-निर्यात

जेएनपीटीमधून जगातील तब्बल 200 देशांसोबत व्यवहार, देशातील 50 टक्के आयात-निर्यात

महाराष्ट्र पुन्हा प्रगतिपथावर स्वार झाला आहे. नैसर्गिक संकटांनंतर राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात होते. मात्र, आपत्ती असो की महामारी, यातून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात वेगाने सावरला असून सर्वच आघाड्यांवर देशाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.

जेएनपीटीची भरारी : जगातील २०० देशांसोबत आयात-निर्यातीचे धागे गुंफणाऱ्या मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) कोरोनापश्चात ५६.८४ लाख टीईयू कार्गो क्षमतेच्या कंटेनर्सचे व्यवस्थापन करून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. कोरोनाकाळात जेएनपीटीने औषधे, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केला. यंदा ५६.८४ लाख टीईयू कंटेनर्सची वाहतूक करण्यात आली. बंदरांच्या माध्यमातून देशातून होणाऱ्या एकूण आयात-निर्यातीच्या दळणवळणापैकी ५० टक्के दळणवळण या बंदरातून होत आहे.

जेएनपीटी सेझ : ५६५ कोटींची गुंतवणूक
लॉजिस्टिक्स, वेअर हाउसिंग, व्यापार व उत्पादन उद्योगांसाठी पायाभूत सुविधांची उभारणी
नवी मुंबई विमानतळ, डीएफसी रेल्वे कॉरिडॉर आणि ट्रान्स हार्बर रोडसोबत कनेक्टिव्हिटीही

10 हजार कोटींची गुंतवणूक व 10,000 रोजगार निर्मिती
वार्षिक मालवाहतूक
1188 लाख मेट्रिक टन
आयात : 352 लाख मेट्रिक टन
निर्यात : 295 लाख मेट्रिक टन

वर्षभरातील कंटेनर वाहतूक
वस्तू : 69 लाख 3,491 कंटेनर्स
द्रव : 59 लाख 83,203 कंटेनर्स
सिमेंट : 08 लाख 7,421 कंटेनर्स