Home Education #Akola | शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना निरोप समारंभ, जि. प. शाळा वणी चा स्तुत्य...

#Akola | शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना निरोप समारंभ, जि. प. शाळा वणी चा स्तुत्य उपक्रम

अकोला ब्यूरो: वणी रंभापूर येथील जिल्हा परिषद शाळेत एक मे दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ईयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनीच मेजवानी देत निरोप दिला असून या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहेे.

कानशिवणी केंद्रा अंतर्गत वणी रंभापूर जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा असून एक ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. नूकत्याच निकालात सातवीचे विद्यार्थी उत्तीर्ण  झाले असून पूढील वर्गात शिकावयास अन्य शाळेत प्रवेश घेणार असून त्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना निरोप आगळ्या वेगळ्या पद्धतिने देण्याची कल्पना मुख्याध्यापक मिना टापरे व मंगेश पेशकर सर, स्नेहल अरखराव व ममता धार्मिक या शिक्षकांच्या मनात होती. त्यानूसार शिक्षकांनी नियोजन करून शाळा व्यवस्थापन समितिचे सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना व त्यांचा निकाल घेण्यासाठी येणारया पालकांना मेजवानी दिली.