नागपूर ब्यूरो: फेसबूक इतिहासात प्रथमच आनंदयात्री फेसबुक ग्रुपने आनंदयात्री एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. श्री राम चिंचलीकर आणि शुभदा ताकाभाते ह्यांनी ह्या एकांकिकेचे आयोजन केले आहे.
दहा केंद्र मिळून एकूण साठ एकांकिका होणार आहेत. त्यातून बारा फायनल निवडल्या जाणार आहेत. विदर्भाच्या एकूण पाच एकांकिका ९ मे रोजी साई राष्ट्रभाषा सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणार आहेत. त्यात नागपूर, वर्धा, भंडारा, तुमसर, बुलढाणा वरुन टिम आपल्या एकांकिका सादर करणार आहेत.
ह्या एकांकिका नि: शुल्क असून आयोजकांनी ह्या एकांकिका बघण्याकरिता नागरिकांना आवाहन केले आहे.