Home मराठी घरगुती गॅस सिलिंडरचे दर 10 वर्षांत दुपटीहून अधिक वाढले; मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री

घरगुती गॅस सिलिंडरचे दर 10 वर्षांत दुपटीहून अधिक वाढले; मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री

सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल ५० रुपयांनी वाढवले. दिल्लीत गॅस सिलिंडरचे दर ९९९.५० रुपये झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर दुपटीपेक्षाही जास्त वाढले. मे २०१२ मध्ये सिलिंडरचे दर ४१० रुपये होते.

महाराष्ट्रात सिलिंडरची हजारी

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर ५० रुपये वाढल्याने महाराष्ट्रात सिलिंडरचे दर हजारापुढे गेले आहेत. एप्रिलपर्यंत सिलिंडर ९५८.५० होते. ते आता १००८.५० रुपयांना घ्यावे लागेल. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसह आता सामान्यांना सिलिंडर दरवाढीच्या झळाही सोसाव्या लागणार आहेत.