Home मराठी संजय राऊत । सोमय्यांनी अनेक बिल्डरांकडून खंडणी वसूल केली, लवकरच चौकशी सुरू...

संजय राऊत । सोमय्यांनी अनेक बिल्डरांकडून खंडणी वसूल केली, लवकरच चौकशी सुरू होईल

किरीट सोमय्या मुंबईतील अनेक बिल्डरांकडून खंडणी वसूल करतात. त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरच त्यांची चौकशी सुरू होणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेमध्ये ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग चालतो. अनेक व्यवसायिकांनी या संस्थेला संशयास्पद देणग्या दिल्या आहेत, असा आरोप करत ईडीनेही या व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत हे सातत्याने किरीट सोमय्यांवर आरोप करत आहे. आजदेखील मोतीलाल ओसवाल कंपनीकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानने लाखो रुपये लाटले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. NSELच्या 5600 कोटी शेअर्स घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ED ने चौकशीही केली. मात्र, स्वतः किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनीच्या शिपायांच्या घरी गेले. तमाशा केला व नंतर 2018-19 असे 2 वर्ष सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.