Home Business आरोग्यसेवा क्षेत्रात पाऊल । सिमेंटनंतर अदानींचा आता आरोग्यसेवा क्षेत्रात प्रवेश

आरोग्यसेवा क्षेत्रात पाऊल । सिमेंटनंतर अदानींचा आता आरोग्यसेवा क्षेत्रात प्रवेश

आशियाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी सिमेंट व्यवसायानंतर आता आरोग्यसेवा क्षेत्रात पाऊल टाकण्यास सज्ज आहेत. यासाठी अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेड (एएचव्हीएल) नावाने १७ मे २०२२ रोजी कंपनी स्थापन केली आहे.

एएचव्हीएल कंपनी चिकित्सा सुविधांची स्थापना, संचालनासह आरोग्य तंत्रज्ञानावर आधारित सुविधा, संशोधन केंद्रे स्थापन करेल. या क्षेत्रात उतरण्यासाठी समूहाची अनेक कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. हा ग्रुप हेल्थकेअर क्षेत्रात सुमारे ३१,०८८ कोटींची गुंतवणूक करू शकतो. वृत्तानुसार अदानी समूह आणि पिरामल हेल्थकेअर सरकारी फार्मा कंपनी एचएलएल हेल्थकेअरची खरेदी करण्याच्या स्पर्धेत आहे. सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये कंपनीतील १०० टक्के भागीदारी खासगी क्षेत्रातील युनिट्सना विकण्याचा निर्णय घेतला होता.

अदानी यांच्या उद्योगांतील वाटचालीचा आढावा घेता असे दिसून येते की, गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध क्षेत्रांत गुंतवणूक वाढवत उत्पन्नही वाढवले आहे. त्यामुळे देशातील अव्वल क्रमांकाचे श्रीमंत म्हणूनही त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे.