अभिनेत्री कंगना रनोटचा ‘धाकड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. रिपोर्ट्सनुसार, सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 8 दिवसांत केवळ 5 कोटींची कमाई करू शकला आहे. इतकंच नाही तर रिलीजच्या 8व्या दिवशी भारतात या चित्रपटाची केवळ 20 तिकिटे विकली गेली आहेत, त्यामुळे ‘धाकड’ केवळ 4,420 रुपयांची कमाई करु शकला. त्याचबरोबर ‘धाकड’ हा कंगनाच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला आहे.
रिपोर्ट्सनुसार, पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ 75 लाखांचा व्यवसाय केला होता.तर पहिल्या आठवड्यात म्हणजे 7 दिवसांत चित्रपट केवळ 2 कोटींचे कलेक्शन करु शकला. रिलीज झाल्यापासून आतापर्यंत चित्रपटगृहांमध्ये ‘धाकड’चा फ्लॉप शो सुरूच आहे. हा चित्रपट भारतात 2200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता.
दुसऱ्या आठवड्यात ‘धाकड’ भारतात केवळ 25 चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात जवळपास 98.80% थिएटरमधून तो काढून टाकण्यात आला आहे. दिल्ली हे सर्वात मोठे शहर आहे, जिथे केवळ 4 थिएटरमध्ये ‘धाकड’चे शो चालू आहेत.