नागपूर शहरातील पाच मेट्रो स्थानकांवर पार्किंग ची व्यवस्था
नागपूर ब्युरो : महा मेट्रो नागपूर प्रकल्पांतर्गत कस्तुरचंद पार्क-सिताबर्डी इंटरचेंज-खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो ट्रेनचे संचालन सुरु आहे. महा मेट्रोच्या विविध स्टेशनवर व्यायवसायिक उपयोगाकरिता जागा उपलब्ध आहे, महा मेट्रोच्या वतीने पीपीपी संकल्पनेच्या आधारे तसेच भाडे तत्वावर जागा देण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. इच्छुक व्यवसाईक पाहिजे त्या स्टेशनवर व्यावासायाकरिता निविदेच्या माध्यमाने जागा प्राप्त करू शकतात.
महा मेट्रोच्या रिच-१ अंतर्गत सिताबर्डी इंटरचेंज ते एयरपोर्ट साऊथ स्टेशन आणि रिच-३ अंतर्गत सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर स्टेशन दरम्यान दोन पिलरच्या मध्ये असलेल्या जागेवर जाहिरात फलक लावण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. याच प्रकारे विविध मेट्रो स्टेशन लगत असलेल्या ५ जागांवर एक वर्षाच्या कालावधीकरिता पार्किंग व्यवस्थे संबंधी देखील निविदा काढली आहे.
व्यावसायिक उपयोगा करिता स्टेशनवर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध
उज्वल नगर मेट्रो स्टेशनच्या जवळ व्यावसायिक उपयोगा करिता ५,५३२ वर्गमीटर जागेवर पीपीपी संकल्पने अंतर्गत भाडे पट्टी तत्वावर ६० वर्षाकरता देण्याचे प्रावधान केले आहेत तसेच ३००० चौ. फूट पेक्षा जास्त प्रॉपर्टी बिज़नेस स्पेस २० वर्षाकरिता लीज वर देण्या करण्याकरिता महा मेट्रोच्या वतीने निविदा काढण्यात आल्या आहेत. व्यायसायिक उपयोगा करिता ७ मेट्रो स्टेशन वर जागा उपलब्ध आहे. ज्यामध्ये सिताबर्डी इंटरचेंज, गड्डीगोदाम चौक, छत्रपति नगर, जयप्रकाश नगर, उज्ज्वल नगर आणि एयरपोर्ट मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.
मेट्रो स्टेशन परिसरात जाहिरात फलक
मेट्रो स्टेशनच्या आत आणि बाहेरच्या क्षेत्रामध्ये जाहिरात करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहे. बाहेरच्या क्षेत्रामध्ये (आउटडोर एडवरटाइजिंग ) रिच-१ आणि रिच-३ च्या अल्टरनेट पिलर (स्पॅन) वर 6 X 8 चौरस वर्गफुटाचे जाहिरात फलक लावण्याचे प्रावधान केले आहे. यामध्ये वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपूल पिलरचा देखील समावेश आहे.
या सोबतच साऊथ एयरपोर्ट स्टेशन ते सिताबर्डी पोलीस स्टेशन (वेरायटी चौक) आणि सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन ते लोकमान्य नगर डेपो पर्यंतच्या क्षेत्राचा समावेश आहे. या सोबतच स्टेशनच्या आत इंटरनल एडवरटाइजिंग (आतंरिक क्षेत्रात जाहिरात) ज्यामध्ये १३ स्टेशनचा समावेश असून या करता देखील निविदा मागविण्यात आल्या असून यामध्ये रिच-१ (सिताबर्डी इंटरचेंज ते एरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन) आणि रिच-४ (सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन) समावेश आहे.
मेट्रो स्टेशन परिसरातील पार्किंग
मेट्रो स्थानकांजवळ प्रवाश्यांकरिता मोठ्या प्रमाणात पार्किंगची जागा उपलब्ध करण्यात आली आहे. ५ पार्किंग जागेवर १ वर्षाच्या कालावधी करिता निविदा काढण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन येथील कलाच माळा (ग्राउंड फ्लोअर) आणि अपर बेसमेंट येथील पार्किंग, यशवंत स्टेडियम जवळील मेट्रो सब स्टेशन जवळील जागा, सिताबर्डी इंटरचेंजच्या पूर्व दिशेला असलेल्या प्रवेश द्वारा जवळील जागा, झिरो माइल आणि सिताबर्डी पोलीस स्टेशन दरम्यानची जागा तसेच कॉटन मार्केट मेट्रो स्टेशनच्या जवळील जागेवर पार्किंग व्यवस्थेचे प्रावधान करण्यात आले आहेत.