Home Environment #Maha_Metro | नागपूर मेट्रो तर्फे पर्यावरण दिन साजरा, वृक्षारोपण आणि रोपटे वाटप

#Maha_Metro | नागपूर मेट्रो तर्फे पर्यावरण दिन साजरा, वृक्षारोपण आणि रोपटे वाटप

नागपूर ब्युरो : पर्यावरण संवर्धनाचे महत्व सांगणाऱ्या आजच्या दिवसानिमित्त महा मेट्रो नागपूर तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हरित मेट्रोची संकल्पना राबवणाऱ्या नागपूर मेट्रो तर्फे आज वृक्षारोपण आणि रोपटे वाटपाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

५ जून पर्यावरण दिवस म्हणून दर वर्षी साजरा होतो. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात येते. याच अनुषंगाने आज महा मेट्रोच्या लिट्ल वूड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. विविध प्रजातीची रोपटी आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात लावण्यात आली.

या नंतर सीताबर्डी इंटरचेंज येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात महा मेट्रो तर्फे प्रवाशांना विविध प्रजातींची रोपटी वाटण्यात आली. यात आंबा, जांभूळ सारख्या फळदार वृक्षांच्या रोपट्यांचा देखील समावेश होता. प्रवाश्यांनी या रोपट्यांचा स्वीकार करत संगोपन करण्याचे आश्वासन पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दिले.

आजच्या या दोन्ही कार्यक्रमात महा मेट्रोचे महा व्यवस्थापक (ऑपरेशन) सुधाकर उराडे, संयुक्त महा व्यवस्थापक (पर्यावरण) प्रतिश निते, संयुक्त महा व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) पंकज मस्के, उप महा व्यवस्थापक (ऑपरेशन) माधव राज आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.