Home Education बारावीचा निकाल । 94.22 टक्के विद्यार्थी पास, कोकण विभागाचा सर्वाधिक 97.21 टक्के...

बारावीचा निकाल । 94.22 टक्के विद्यार्थी पास, कोकण विभागाचा सर्वाधिक 97.21 टक्के निकाल

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा यंदाचा निकाल 94.22 टक्के लागला. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा 2.06 टक्क्यांनी अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे.

95.35 विद्यार्थिनी पास

राज्य बोर्डाची परीक्षा यंदा ऑफलाईन स्वरूपात घेण्यात आली. त्यामध्ये 8 लाख 17 हजार 611 विद्यार्थी तर, 6 लाख, 68 हजार, 88 विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी 95.35 विद्यार्थिनी पास झाल्या तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण 93.29 टक्के आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात मंडळाच्या मुख्यालयातील पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

असा पाहा निकाल

मंडळाच्या www.mahahscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला आहे. संकेतस्थळावर गेल्यावर होम पेजवर इयत्ता 12 वी निकाल 2022 ही लिंक पहावी. क्लिक केल्यावर नवे पेज उघडेल. तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मदिनांक टाकून सबमिट केल्यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. या वर्षी 14 लाख 85,826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

विभागनिहाय निकाल

पुणे: 93.61%, नागपुर: 96.52%, औरंगाबाद: 94.97%, मुंबई: 90.91%, कोल्हापूर: 95.07%, अमरावती: 96.34 %, नाशिक: 95.03%, लातूर: 95.25%, कोकण: 97.21%