Home कोरोना कोरोना । महाराष्ट्रात नवीन रुग्ण 1800 च्या पार; पुण्यात आढळला BA.5 व्हेरियंटचा...

कोरोना । महाराष्ट्रात नवीन रुग्ण 1800 च्या पार; पुण्यात आढळला BA.5 व्हेरियंटचा चौथा रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. यासोबतच राज्यात BA.5 व्हेरियंटचा देखील एक रुग्ण सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील 31 वर्षीय महिलेचा अहवाल BA.5 व्हेरियंट पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यात आतापर्यंत या व्हेरियंटचे चार रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात 28 मे रोजी BA.4 चे चार आणि BA.5 चे तीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या या नव्या विषाणूची संख्या एकूण आठ इतकी झाली आहे.

मंगळवारी राज्यात सर्वाधिक 1881 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिलासादायक म्हणजे एकही जणाचा मृत्यू झाला नसून, 878 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकट्या मुंबईत 1242 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 8432 रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण 6.48 टक्के इतका आहे. म्हणजेच 100 जणांमध्ये 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे.

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत 7.8 लाख जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. तर 7.7 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना सुखरुप घरी सोडण्यात आले आहे. तर 1 लाख 47 लाख रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 3714 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2513 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोनाचे 63 अधिकचे रुग्ण सापडले आहेत. सोमवारी 3651 रुग्ण आढळले होते. तर 2497 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात 450 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, 264 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत 1534 रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिल्लीतील रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण हा 4.94 टक्के इतका आहे.

दिल्लीत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत 1.9 लाख कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर आतापर्यंत 1.8 लाख जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत दिल्लीत 26 हजार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 15 मे पासून दिल्लीतील कोरोना वेग मंदावला आहे.