दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी दिलेल्या आदेशात डीजीसीएने विमान कंपन्यांना सांगितले की, सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांनी मास्क लावल्याची खात्री करावी. मास्क असामान्य परिस्थितीत आणि योग्य कारणासाठी हटवला जाऊ शकतो. डीजीसीएने म्हटले की, जर एखादा प्रवासी वारंवार सूचना करूनही निर्देशांचे पालन करणार नसेल तर त्यास उड्डाणापूर्वी विमानातून उतरवले पाहिजे.