Home मराठी बेरोजगारांसाठी खुशखबर । दीड वर्षात केंद्र सरकार देणार 10 लाख नोकऱ्या, पंतप्रधान...

बेरोजगारांसाठी खुशखबर । दीड वर्षात केंद्र सरकार देणार 10 लाख नोकऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

वाढती महागाई आणि बेरोजगारी दर यातून सर्वांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार ॲक्शन मोड मध्ये दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला. तसेच पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये दहा लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी अशा सूचना देखील त्यांनी सर्व विभाग आणि मंत्र्यालयांना दिले आहेत.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. सत्ताधारी भाजप सरकार विरोधात काँग्रेस पक्षाने देशभरात महागाई आणि बेरोजगारी वरून मोर्चा उघडला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे देखील बेरोजगारी दर वाढत असल्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील दीड वर्षातच भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून भारतातील सुमारे दहा लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळं बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी ठरेल.

पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या या घोषणेवर काँग्रेस पक्षाने टीका केली आहे. भाजपने दरवर्षी दोन कोटी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणजेच आठ वर्षात सोळा कोटी नोकऱ्या देणार होते. आता 2024 पर्यंत फक्त दहा लाख नोकऱ्या देणार असल्याचं सांगितलं जातंय. सध्या देशात 60 लाख पदे रिक्त आहेत तर तीस लाख तर केंद्रातील पदे रिक्त आहे. अशा प्रकारची घोषणाबाजी कधी पर्यंत करणार? असा प्रश्न काँग्रेसचे नेते रणजीत सिंग सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.