Home मराठी राहुल गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी: निदर्शनामध्ये सुरजेवाला, चिदंबरम यांच्यासह अनेक नेते...

राहुल गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी: निदर्शनामध्ये सुरजेवाला, चिदंबरम यांच्यासह अनेक नेते जखमी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी राहुल गांधी दुसऱ्या दिवशी कारमधून तपास संस्थेच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही कारमध्ये होत्या. राहुल यांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर प्रियांका तेथून निघून गेल्या. त्यांच्यासोबत पायी चालत निघालेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांना पोलिसांनी खेचून व्हॅनमध्ये नेले. त्यांच्याशिवाय अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनादरम्यान सुरजेवाला आणि चिदंबरम जखमी झाले आहेत.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची काँग्रेस कार्यालयाजवळील बॅरिकेडवर थांबल्यानंतर दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. ते पोलिसांना म्हणाले- तुम्ही मुख्यमंत्र्यांना रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही.

तत्पूर्वी, राहुल प्रियंका गांधींसह त्यांच्या घरातून काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. राहुल-प्रियांका यांच्यासोबत काँग्रेस मुख्यालयात सर्व काँग्रेस नेत्यांनी चर्चा केली. येथून रणनीती तयार झाल्यानंतर राहुल ईडी कार्यालयाकडे रवाना झाला.