Home हिंदी कोविड- 19 : आ. कृष्णा खोपडे म्हणतात, आता नागपुरात लॉकडाउन व्हावे

कोविड- 19 : आ. कृष्णा खोपडे म्हणतात, आता नागपुरात लॉकडाउन व्हावे

758

नागपूर : नागपूर जिल्हयात 50 हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण झाले असून अजूनही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हयात तीन मंत्री असून देखील निर्णय घेण्यात सक्षम नाही, असा घनाघाती आरोप करत भाजप चे आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपुरात किमान 10 दिवसाचे लॉकडाउन करावे असे म्हटले आहे. मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी शहरात लॉक डाउन असतांना ते हटविण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वर दवाब टाकणाऱ्यांमध्ये आ. खोपड़े सुद्धा समोर -समोर दिसत होते.

आ. खोपड़े म्हणतात की कदाचित त्यामुळेच जिल्ह्याबाहेरील मंत्री विजय वडेट्टीवार यांना दखल घ्यावी लागत आहे. ना. नितिन राऊत नागपुरात लॉकडाऊनच्या विरोधात आहे तर ना. अनिल देशमुख दंडाची रकम वाढवून मोकळे झाले. ना. सुनील केदार स्वत: कोरोनाग्रस्त असून नागपूर ऐवजी मुंबई येथे उपचार घेत आहे. मात्र ना. विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पुन्हा एकदा किमान एक आठवड्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे सांगितले. या दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यामध्ये लॉकडाऊनबाबत मतभेद असताना जनता मात्र वा-यावर आहे.

आ. खोपड़े म्हणतात, वास्तविक पाहता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता खाजगी व सरकारी दोन्ही रुग्णालयात बेडची कमतरता आहे. जम्बो हॉस्पिटल सुरु करण्यात जिल्ह्याचे तिन्ही मंत्री यांनी कधीच प्रयत्न केले नाही. अशा परिस्थितीत सर्वपक्षीय बैठक बोलावून नागपूरच्या हिताच्या दृष्टीने लॉकडाऊनबाबत कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. मध्यप्रदेश सहित अनेक राज्यात व जिल्हयात कुठे आठवड्यातून एक दिवस तर कुठे दोन दिवस आणि काही ठिकाणी सरसकट 8 ते 10 दिवसाचे लॉकडाऊन होत आहे. आणि नागपूरचे पालकमंत्री रुग्णसंख्या एक लक्ष होण्याची वाट पाहत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

महापौरांनी तात्काळ जनप्रतिनिधीची बैठक बोलवावी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे मत अनेक व्यापारी संघटनांनी उघडपणे व्यक्त केले असून याबाबत सकारात्मक निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ जनप्रतिनिधीची बैठक बोलवावी व लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू लावण्याबाबत सर्व सहमतीने निर्णय घ्यावा. अनेक व्यापारी संघटना देखील नागपुरात आठवड्यातून किमान दोन दिवस तरी जनता कर्फ्यू असावा, अशी मागणी करीत आहे. मात्र कॉंग्रेसच्या दोन नेत्यामध्ये झालेल्या मतभेदांमुळे नागपूरच्या हिताकडे सरकारचे लक्ष नसल्याची प्रतिक्रिया आ. कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.