Home मराठी पूर परिस्थिती ची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याचे मुंबई साठी प्रयाण

पूर परिस्थिती ची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याचे मुंबई साठी प्रयाण

नागपूर ब्युरो : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रात्री ११.४५ मिनिटांनी विशेष विमानाने मुंबईसाठी प्रयाण झाले.

विमानतळावर विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, जिल्हाधिकारी आर विमला , सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीसआयुक्त अश्वती दोरजे, तसेच पोलिस, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर गडचिरोली येथे पूर परिस्थितीचा आढावा घेतला, खराब हवामानामुळे हेलिकॅप्टर ऐवजी रस्ते मार्गाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली येथील प्रत्यक्ष पूरपरिस्थिती व बाधित भागाची पाहणी केली त्यानंतर नागपूर येथील विमानतळावरून विशेष विमानाने रात्री अकरा पंचेचाळीस वाजता प्रयाण केले.