महाविकास आघाडी सरकारने संभाजीनगर आणि धाराशिव ही नावे बदलण्यासह एकूण पाच निर्णय घेतले होते. हे निर्णय जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले असले तरी ही भाजपची अनेक वर्षांपासून मोर्चे काढून नाव देण्याची मागणी होती. आता जर हे निर्णय मागे घेत असतील तर हे हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.