Home Nagpur नागपुरात कोरोनाचा कहर, खासगी शाळेतील ३८ विद्यार्थी कोरोना बाधित

नागपुरात कोरोनाचा कहर, खासगी शाळेतील ३८ विद्यार्थी कोरोना बाधित

नागपूर ब्युरो : नागपुरात कोरोनाने कहर केला आहे. नाही नाही म्हणता कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून रविवारी २६२ जण बाधित झाले आहे. यात हिंगणा रोड येथील जयताळा भागातील राय इंग्लिश स्कूलमधील ३८ विद्यार्थी कोरोना बाधित निघाले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी या शाळेचे विद्यार्थी कोरोना बाधित निघाल्याचे सांगितले. शुक्रवार १५ जुलै रोजी शाळेतील मुलांची आरटीपीसीआर करण्यात आली. १६ रोजी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. रविवारी त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असे जोशी यांनी सांगितले. सरसकट कोणत्याही शाळेची तपासणी करण्यात येणार नाही. पालकांनी वा शाळा संचालकांनी िवनंती वा मागणी केल्यास नमुने घेण्यात येतील असे जोशी यांनी स्पष्ट केले.

शाळा बंद ठेवणार

राय इंग्लिश स्कूलचे संचालक डाॅ. एम. एम. राय यांनी शाळा बंद ठेवणार असल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. आम्ही सर्व मुलाच्या पालकांना मुलांची आरटीपीसीआर करायला सांगणार आहो. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यावरच शाळेत प्रवेश देऊ. त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ देणार नाही असे राय यांनी सांगितले.
३ जुलैपासून नागपुरात कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

  1. २ जुलै रोजी ९५ बाधितांची नोंद झाली होती.
  2. त्या नंतर ३ जुलै रोजी १०५ बाधितांची नोंद झाली.
  3. ५ जुलै : १३५,
  4. ६ जुलै : ९६,
  5. ७ जुलै : ११८,
  6. ८ जुलै : १३८,
  7. ९ जुलै : १२६,
  8. १० जुलै : १२८,
  9. १२ जुलै : १४६,
  10. १३ जुलै : १९४,
  11. १४ जुलै : १४०,
  12. १६ जुलै : १७६
  13. आणि रविवार १७ जुलै रोजी एकदम २६२ कोरोना बाधित निघाले.
  14. यात शहरातील १६२, ग्रामीणमधील १०० बाधितांचा समावेश आहे.