Home Nagpur नासुप्र/नामप्रविप्रा येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवांतर्गत राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात

नासुप्र/नामप्रविप्रा येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवांतर्गत राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात

नागपूर ब्युरो : सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालय परिसरात आज मंगळवार, दिनांक, ९ ऑगस्ट रोजी “स्वातंत्र्य अमृत महोत्सवांतर्गत” “स्वराज्य महोत्सव” साजरा करीत आहे. त्या निमित्त आज राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘नासुप्र’चे महाव्यवस्थापक श्री. निशिकांत सुके, ‘नामप्रविप्रा’चे अपर आयुक्त श्री. अविनाश कातडे, नामप्राविप्र’चे नगर रचना विभागाचे सह संचालक श्री. आर. डी. लांडे, ‘नासुप्र’चे अधीक्षक अभियंता श्री. प्रशांत भांडारकर, ‘नामप्रविप्रा च्या अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता श्री. पातोडे, कार्यकारी अभियंता श्री. संजय चिमुरकर, आणि कार्यकारी अभियंता श्री. अनिल राठोड तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. आज मंगळवार, दिनांक ०९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध उपक्रम नासुप्र/नामप्रविप्रा कार्यालयात राबविण्यात येणार आहे.