नागपूर ब्युरो : नागपूर जिल्ह्याचे नव नियुक्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी आज महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रो भवनला सदिच्छा भेट दिली. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या सोबत मेट्रोच्या प्रलंबित प्रकल्पा समवेत जमीन आणि महसूल संदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
मेट्रो भवन आणि आणि प्रकल्पा संबंधी माहिती जाणून घेत त्यांनी नागपूर मेट्रोचे कौतुक ही केले. डॉ. ईटनकर यांच्या भेटी दरम्यान त्यांना एक्सपीरियस सेंटर, एक्सझीबिशन सेंटर, लायब्ररी आणि सभागृह त्यांनी बघितले.
यावेळी महा मेट्रोचे संचालक(प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री. अनिल कोकाटे, संचालक(वित्त) श्री. हरेंद्र पांडे आणि मेट्रोचे इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.