Home Business Nagpur । क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्स्पो 7 ऑक्टोबरपासून

Nagpur । क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्स्पो 7 ऑक्टोबरपासून

408

क्रेडाई नागपूर मेट्रोच्या चारदिवसीय प्रदर्शनाची माहिती देताना क्रेडाईचे पदाधिकारी.

  • चार दिवसीय एक्स्पो मध्ये क्रेडाई नागपूर मेट्रोच्या प्रॉपर्टी होणार प्रदर्शित

नागपूर ब्युरो : क्रेडाई नागपूर मेट्रोच्या शहरातील प्रतिष्ठित बाराव्या चार दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन येत्या 7 ऑक्टोबरपासून शहरातील चिटणीस सेंटर, सिव्हिल लाइन्स येथे करण्यात येणार आहे. एकाच छताखाली क्रेडाई नागपूर मेट्रो सदस्यांच्या प्रॉपर्टी प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती एक्स्पोचे संयोजक विशाल अग्रवाल यांनी गुरुवारी याठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत दिली.

सदर प्रदर्शनात दोन डोममध्ये क्रेडाई सदस्यांचे 22 पॅव्हेलियन व 54 लहान स्टॉल्स तसेच पुणे आणि मुंबई येथील; पण नागपुरात कार्यरत बिल्डरांचेही स्टॉल राहतील. चार दिवसात होणाऱ्या चार सेमिनारमध्ये संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. क्लिअर टायटल, मंजूर प्रॉपर्टी, रेरा रजिस्टर प्रॉपर्टी तसेच शहराच्या चारही कोपऱ्यातील सर्वच प्रकारच्या प्रॉपर्टीज एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात येतील.

त्यामुळे ग्राहकांना एकाच छताखाली आवडत्या परिसरात बजेटमध्ये प्रॉपर्टी खरेदीची संधी राहील. लोकांना मनपा, नासुप्र, एनएमआरडीएच्या प्रॉपर्टीजची माहिती होईल. काही कंपन्या आणि बिल्डर्सचे फेस्टिव्हल ऑफर्सही राहतील. चार दिवसात 40 ते 50 हजार लोक प्रदर्शनाला भेट देतील. एचडीएफसी हाउसिंग एक्स्पोचे प्रायोजक, तर कजारिया बाथवेअर सहप्रायोजक आहेत. एक्स्पोमध्ये कर्जसुविधांसह घर खरेदीची सुवर्णसंधी असल्याचे विशाल अग्रवाल म्हणाले.

पत्रपरिषदेत एचडीएफसी हाउसिंगचे सहायक महाव्यवस्थापक सचिन पलसोकर, क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष विजय दर्गण, सचिव गौरव अगरवाला, कोषाध्यक्ष राजमोहन शाहू, सहसंयोजक तारक चावला, चंद्रशेखर खुणे, हेमल नादियाना, विजयसिंग ठाकूर, अभिषेक जवेरी, प्रतीश गुजराती, विजय जोशी, विनोद कुबडे, अशोक चांडक, राहुल अग्रवाल, राहुल पिसे, प्रशांत सरोदे, सुनील दुद्धलवार उपस्थित होते. (वा.प्र.)