Home हिंदी Maharashtra । संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी:​​ मुंबई सत्र न्यायालयात ईडी...

Maharashtra । संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी:​​ मुंबई सत्र न्यायालयात ईडी सादर करणार उत्तर

396

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राऊतांच्या याचिकेवर आज ईडी कोर्टात उत्तर सादर करणार आहे. गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सध्या राऊत मुंबई आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश विशेष न्यायालयाने दिले होते. मागील एक महिन्याहून अधिक काळापासून राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. जामिनासाठी त्यांची कोर्टात धावाधाव सुरू आहे.

ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला. आज या अर्जावर सुनावणी होणार असून मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ईडी आपले उत्तर सादर करणार आहे.

ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणी राऊत यांना अटक केली असून, गेल्या काही दिवसांपासून ते कोठडीत आहेत. जामिनासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ईडी आपले उत्तर सादर करणार आहे.

राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असून त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. पण त्याआधीच आज ईडी आपले उत्तर कोर्टात सादर करणार आहे.