Home Nagpur #Nagpur | ‘क्रेडाई एक्स्पो’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद, 200 पेक्षा जास्त मान्यता प्रकल्प...

#Nagpur | ‘क्रेडाई एक्स्पो’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद, 200 पेक्षा जास्त मान्यता प्रकल्प एकाच छताखाली

374

नागपूर ब्यूरो : गुंतवणूकीत चांगला परतावा देणारा आणि सुरक्षित पर्याय म्हणून प्रॉपर्टीकडे बघण्यात येते. मात्र मान्यता प्राप्त प्रकल्प मिळेल का? आपणी गुंतवणूक सुरक्षित राहील का ही चिंता गुंतवणूक दारांना असायची, नागरिकांची ही चिंता दूर करण्यासाठी क्रेडाई नागपूर मेट्रोच्यावतीने 10 ऑक्टोबर दरम्यान ‘क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो 2022’चे आयोजन केले असून प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनात नागरिकांना फ्लॉट, फ्लॅट, व्हिला, फार्महाऊस, दुकान, मॉल आधींचे सुमारे 200 पेक्षा जास्त प्रशासनाचे मान्यता प्राप्त प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटर येथे सकाळी 11 ते रात्री 9 दरम्यान नागरिकांना येथे भेट देता येईल. एक्स्पोमध्ये प्रवेश निशुल्क असून मुबलक प्रमाणावर पार्किंगचीही व्यवस्था आहे.

नागरिकांचे आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागील 11 वर्षांपासून क्रेडाईतर्फे या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत असून यंदा या प्रदर्शाचे यशस्वी बारावे वर्ष आहे. गुंतवणूकदारांसह विकासकांसाठीही हा एक्स्पो वरदान ठरत आहे. नागरिकांना याठिकाणी गुंतवणूकीचे विविध पर्याय एकाच ठिकाणी मिळत असल्याने गुंतवणूकीचे विचार करणाऱ्यांसाठी हे वन स्टॉप डेस्टिनेशन ठरत आहे. एक्स्पोमध्ये नागरिकांसह गुंतवणूकीसाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच मान्यवर भेट देत असून विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेत आहेत. एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी आमदार विकास कुंभारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. प्रकल्पाचे मुख्य स्पॉन्सर म्हणून एचडीएफसी, एस्सार लॅन्ड्स (Kesar Lands) आणि कोरोडीट (Korovit) लाभले आहे.

या प्रदर्शनीमध्ये सुरुवातीच्या 14 लाख रुपयांपासून तर पुढे स्वतंत्र रो हाऊस, घर, आदींचे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या एक्स्पोमध्ये असलेल्या सर्व प्रॉपर्टी ह्या महारेरा आणि एनएमआरटीएच्या मान्यता प्राप्त असल्याने ग्राहकांनाही शहरातील सर्व विश्वासू बिल्डर्सचे प्रकल्प एकाच ठिकाणी बघण्यास मिळणार आहे. या एक्स्पोमध्ये शहराच्या मध्यभागापासून तर दाभा, मिहान, भंडारा रोड, चंद्रपूर रोड, वर्धा रोड, अमरावती रोड, उमरेड रोड, मनिषनगर, बेसा आदी ठिकाणच्या सर्व मान्यता प्राप्त आणि खात्रीशिर प्रकल्पांची माहिती मिळत आहे.

ईएमआयमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज

मालमत्ता खरेदी, किंवा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक विश्वासाने स्थान बनले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी एक्स्पोमधील प्रकल्पांना राष्ट्रीयकृत बँकांची आधीच मान्यता प्राप्त आहे. त्यामुळे कर्ज घेण्यासाठीही नागरिकांना बँकांमध्ये चकरा मारण्याची गरज पडणार नाही. याठिकाणी विविध प्रकल्पांवर किती कर्ज मिळेल. यासाठी डाऊन पेमेंट किती ही सर्व माहिती एका जागेवरच उपलब्ध होत असल्याने नागरिकांना निर्णय घेणे सोयीचे ठरत आहे.