स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये संजनाची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने आत्महत्या केली आहे. वैशालीचा मृतदेह इंदूरच्या साईबाग स्थित तिच्या घरी आढळला. तेजाजी नगर पोलिसांच्या माहितीनुसार, वैसालीने 16 ऑक्टोबर रोजी गळफास घेतला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम एस रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, उज्जैनच्या महिपालपूरची वैशाली ठक्कर गत वर्षभरापासून इंदूरमध्ये राहत होती. तिच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोटही आढळली आहे. सकृतदर्शनी ही घटना प्रेम प्रकरणामुळे घडल्याचा दावा केला जात आहे.
वैशाली ठक्करने इंदूरच्या साईबाग स्थित आपल्या घरात गळफास घेतला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना वैशालीच्या मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट आढळली आहे. पोलिसांनी लव्ह अफेअरमुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करत आपला तपास सुरू केला आहे. वैशालीच्या सुसाइड नोटमधील तपशील अजून उजेडात आला नाही. त्यामुळे याविषयी विविध अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.
वैशाली ठक्करने स्टार प्लसच्या ये रिश्ता क्या कहलाता है या सिरिअलद्वारे आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला होता. या मालिकेत तिने संजनाची भूमिका साकारली होती. त्यानतंर वैशालीने ये वादा रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क तथा विष व अमृत सारख्या अनेक टीव्ही मालिकांत काम केले.
ससुराल सिमर का-2 मध्ये अंजली भारद्वाजचा रोल प्ले करण्यासाठी वैशालीला बेस्ट एक्ट्रेस इन निगेटिव्ह रोलचा गोल्डन पेटल अवॉर्ड मिळाला होता. वैशाली 2019 मध्ये मनमोहिनी मालिकेत शेवटची दिसली होती.