Home Maharashtra Chandrapur । आजपासून चंद्रपूर-पुणे मार्गावर धावणार एसटीची शिवशाही बस

Chandrapur । आजपासून चंद्रपूर-पुणे मार्गावर धावणार एसटीची शिवशाही बस

382
चंद्रपूर-पुणे-चंद्रपूर या मार्गावर शिवशाही आसनी बससेवा १७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होत आहे. वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने ही बससेवा नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सेवेत सुरू होत आहे.

चंद्रपूर-पुणे-चंद्रपूर या मार्गावर एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून c सुरू व्हावी, अशी मागणी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी म.रा. मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधला व पाठपुरावा केला. आठवडाभरातच म.रा. मार्ग परिवहन महामंडळाने ही शिवशाही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

ही बस चंद्रपूर येथून पुणे करिता दुपारी ३.०० वाजता सुटणार असून परतीला पुणे येथून चंद्रपूरकरिता सायंकाळी ६.०० वा. सुटणार आहे. या बसफेरीचा मार्ग चंद्रपूर-भद्रावती-वरोरा-वणी-यवतमाळ- कारंजा- वाशिम-मेहकर- जालना- औरंगाबाद-अहमदनगर- पुणे असा आहे. ही बससेवा सुरू होणार असल्याने दिवाळीदरम्यान चंद्रपूर-पुणे प्रवास करणाऱ्या, पुण्यात अभ्यास व नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.