अध्यक्ष पदी कोक्कड्डे तर उपाध्यक्ष पदी कुंदा राऊत
नागपूर ब्यूरो: नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता झालेल्या निवडणूकी दरम्यान मागील २ ते ३ दिवसापासून मोठ्या नाट्यकीय घडामोडी घडत असतांना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी आपल्या चाणाक्ष अश्या व्यूहरचनेने विरोधकांना चारही मुंड्या चित करीत अध्यक्ष पदी पाटनसावंगी सर्कल च्या मुक्ता कोक्कड्डे व उपाध्यक्ष पदी गोधणी सर्कलच्या कुंदा राऊत यांनी निवड करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागला असता विरोधी पक्षाने सुध्दा आपली व्युहरचना रचली असता निवडणूक रिंगणात तरबेज असणारे सुनील केदार यांना मात्र मात देता आली नाही.व पुन्हा एकदा नागपूर जिल्हा परिषदेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
काँग्रेस पक्षाच्या मुक्ता कोक्कड्डे यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणूकित ३९ विरुद्ध १८ मतांनी विजय संपादन केला त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कुंदा राऊत यांनी ३८विरुद्ध १९ मतांनी विजय संपादित केला.
ही परिवर्तनाची लहर– सुनील केदार
आपल्या वक्तव्यात माजी मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की हा निवडणुकीचा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. आणि भविष्यात सुद्धा अश्याच निकालाची अपेक्षा आहे. हा विजय म्हणजे महाविकास आघाडी शासनाने केलेल्या कामाची पावती होय. व यानंतर सुद्धा ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाकरिता तत्पर राहणार असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.