दिवाळी सण धनत्रयोदशीपासूनच (Dhantrayodashi 2022) सुरू होतो. दिवाळीआधी साजरा केल्या जाणाऱ्या धनत्रयोदशी या सणाला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी लोक सोन्या-चांदीची भांडी खरेदी करणे शुभ मानतात. हा सण आश्विन कृष्ण त्रयोदशीला सजरा केला जातो. यालाच धन त्रयोदशी असेही म्हणतात. यंदा धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाणार आहे.
धनत्रयोदशीच्या विशेष मुहूर्तावर देवी लक्ष्मीसह भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. परंतू धनत्रयोदशी का साजरी केली जाते आणि या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे का शुभ मानले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? या लेखात आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त
धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त 23 ऑक्टोबरच्या सूर्योदयापासून सायंकाळी 06.03 पर्यंत आहे.