Home Deepawali Deepawali 2022 | भावाला औक्षण, टिळा लावताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Deepawali 2022 | भावाला औक्षण, टिळा लावताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

459

दिवाळीचा पाच दिवसांचा सण भाऊबीज झाली की संपतो. हिंदू धर्मातील रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजच्या सणालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते, भाऊ-बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. यावेळी 26 ऑक्टोबर 2022 रोजी भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे. भाऊबीजेला औक्षण करताना टिळा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया भाऊबीज सणाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातात आणि तिला काही वस्तू भेट म्हणून देतात. त्या बदल्यात बहिणी आपल्या भावाचे स्वागत करतात आणि त्याला जेवण देऊन औक्षणाने आदरातिथ्य करतात. पौराणिक मान्यतेनुसार असे केल्याने, अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते आणि दीर्घायुष्याचे वरदान मिळते. भाऊबीजेशी संबंधित काही विशेष नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत.

भाऊबीजेला भावाला औक्षण करून टिळा लावताना दिशेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार टिळा लावतेवेळी भावाचे तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे. त्याचबरोबर बहिणीचे तोंड ईशान्य किंवा पूर्व दिशेला असणे शुभ असते.

औक्षण करण्यासाठी ईशान्य दिशेला पाठ मांडणे श्रेयस्कर आहे, हे लक्षात ठेवा. औक्षण करण्याच्या जागी पीठ आणि शेणाचा वापर केला तर उत्तम. भावाला पाठावर बसून औक्षण करावे टिळा लावावा. यासोबतच मनगटावर धागा बांधून ताट ओवाळू शकता. भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी.