Home मराठी #Accident । मध्य प्रदेशात भीषण बस अपघात, 15 ठार, 35 प्रवाशी गंभीर

#Accident । मध्य प्रदेशात भीषण बस अपघात, 15 ठार, 35 प्रवाशी गंभीर

404

​​​​​​​डोंगरावरून उतरताना बस ट्रेलरमध्ये शिरली, दिवाळीसाठी घरी येत होते

मध्य प्रदेशाच्या रेवालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर एका बसला भीषण अपघात झाला आहे. सोहागी डोंगरावरून उतरणारी एक बस समोरच्या एका ट्रेलरमध्ये शिरली. या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 35 जण जखमी झाले आहे. सोहागी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना रुग्णालयात त्योंथर सरकारी रुग्णालयात हलवले.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडला. बस हैदराबादून रेवामार्गे गोरखपूरला जात होती. डोंगरावरून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. बसच्या कॅबिनमध्ये जवळपास 3-4 प्रवाशी अडकले होते. अपघाताचे कारण अद्याप समजले नाही.

बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. जखमींत बहुतांश कामगारांचा समावेश आहे. सर्वजण दीपावली साजरी करण्यासाठी घरी जात होते. त्योंथर रुग्णालयात मध्यरात्री 1 वाजेपर्यंत 55 जण पोहोचले होते.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी सतनाला येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सोहागी डोंगरावर झालेल्या या घटनेतील मदत कार्यासाठी संपूर्ण जोर लावला आहे. आरटीओ मनीष त्रिपाठी यांनी मदतीसाठी काही क्रेनही बोलावले आहेत.